
पिंपरी विकास योजना सुनावणी अंतिम टप्प्यात
बातमी थोडक्यात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्याच्या सुनावणीचा अंतिम टप्पा गाठला आहे. ५६ हजार ७७९ आक्षेपांपैकी ४९ हजार ५४२ आक्षेपांवर सुनावणीत कार्यवाही करण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे नगर नियोजन विभागाचे उद्दिष्ट असून त्यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.