
दगडूशेठ गणपतीला ५५१ पदार्थांचे नैवेद्य
बातमी थोडक्यात
त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५५१ पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात फळांसोबत गोड, तिखट, आंबट, खारट पदार्थांचा समावेश होता. भाविकांना प्रसाद देताना विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.