
दुष्काळामुळे वारणा कुस्ती रद्द
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे वारणा नगर येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान रद्द करण्यात आले असून, तात्यासाहेब कोरे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी खास चारा योजना जाहीर करत, १३ डिसेंबर रोजी चारा देण्यासाठी पीएमआर प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. वारणा ग्रुपकडून ३० हजार टन चारा पुरवण्यात येणार आहे.