
बिहार, बंगाल, नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का
बातमी थोडक्यात
बिहार, पश्चिम बंगाल आणि नेपाळमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. कोशी प्रांतात रिश्टर स्केलवर ५.४ इतका सर्वात मोठा धक्का जाणवला. समस्तीपूर आणि उत्तर बंगालमधील रहिवाशांना सकाळी ७:०४ च्या सुमारास काही सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले. अद्याप कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही.