
सायबर फसवणुकीत ७८ वर्षीय डॉक्टरची १० लाखांची फसवणूक
बातमी थोडक्यात
कोथरूडमधील ७८ वर्षीय डॉक्टरला राष्ट्रीयीकृत बँकेच्या पेन्शन कार्डाचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी १० लाख रुपयांची फसवणूक केली. गुन्हेगारांनी सप्टेंबर महिन्यात या डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीचे बँक तपशील मिळवून ऑनलाईन १० लाख रुपये काढले. कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.