
एका आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
बातमी थोडक्यात
सोन्याचे दर दहा ग्रॅममागे सहा हजार रुपयांनी घसरले, ते एक लाख चौतीस हजारांवर पोचले, तर चांदीचे दर किलोमागे सतरा हजार दोनशे रुपयांनी घसरले, ते एक लाख साठ हजार रुपयांवर स्थिरावले. जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने ही घसरण झाली. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचा फायदा ग्राहकांना झाला आहे.