
४२ कलाकारांचा इंद्रधनुष्य युवा महोत्सवासाठी नाशिककडे कूच
बातमी थोडक्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून २२ व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवात भाग घेण्यासाठी ४२ कलाकारांचा पथक नाशिककडे रवाना झाला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणाऱ्या या महोत्सवात पाच कलागटांतील २८ विद्यापीठांचा सहभाग असून २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान २८ कलाप्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहेत.