
हसनाळात देवतेच्या मूर्तीवरून वाद, महिलेची हत्या
बातमी थोडक्यात
मुखेड तालुक्यातील हसनाळ (पोस्ट. दे.) येथे नवीन घरातून देवतेची मूर्ती फेकल्यावरून झालेल्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली. दीपक चंदन गाडगे यांच्या घरी वास्तु शांती कार्यक्रमात लक्ष्मीबाई चंदर गाडगे यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. मारुती भुजंग गायकवाळे याला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे.