
पीएम स्वनिधी पुरस्कारासाठी परळीची निवड
बातमी थोडक्यात
पीएम स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परळी वैजनाथ नगरपरिषदेला स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ ने गौरवण्यात आले. फेरीवाल्यांना आर्थिक अडचणी दूर करून त्यांचा लघुउद्योग अधिक सक्षम करण्यासाठी ६ कोटी ७२ लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.