
पुणे टिंबर मार्केट आग: ४५ दुकानं आणि ६ घरं जळून खाक
बातमी थोडक्यात
पुण्यातील जय वल्लभ स्कूल जवळच्या टिंबर मार्केट मध्ये भीषण आग लागल्याने ४५ दुकानं आणि सहा घरं जळून खाक झाली. आगीच्या धुराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ३१ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तासन्तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.