
गोदावरी पाणी विवाद: शेतकऱ्यांच्या हक्काची याचिका मुख्यमंत्र्यांपर्यंत
बातमी थोडक्यात
गोदावरी पाणी वाटपात झालेल्या विषमतेच्या विरोधात ११ नोव्हेंबरपासून महांकल वडगाव-नागमठाण पुलावर शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. काही धरणे भरली जात आहेत तर काही कोरडी पडली आहेत. यासह शेतकऱ्यांच्या पाणी हक्काचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करणारे ई-मेल निवेदन अजित नारायण पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते. पाणी सोडण्याचे आश्वासन प्रशासनाने यापूर्वी दिले होते. परंतु, प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे.