
शिरूर : दुष्काळ निवारणासाठी गोवंश केंद्र सुरू
बातमी थोडक्यात
अनाथ निराश्रित मुलांचीही काळजी घेणाऱ्या मे. सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेमार्फत अहिल्या नगर जिल्ह्यातील जटेगाव येथे 'द्वारकामाई गोरक्षण' या नावाने गोवंश केंद्र उभारण्यात आले. दुष्काळ परिस्थितीत येथील शेतीसाठी जनावरे असल्याने पुणे व नगर जिल्ह्यातील शेतकरी व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात २५ गायींचे संगोपन करण्यात येणार असून, हळूहळू संख्या वाढविण्याचे नियोजन आहे.