
घाड नदी खोऱ्यात बांधण्यात आलेला कच्चा तटबंध
बातमी थोडक्यात
घाड नदी खोऱ्यातील बाणेवाडी गणपती सन्ना येथे कच्चा तटबंध बांधण्यात येत असून याची सुरुवात आसीये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांनी केली. बांधकामात जनतेचा सहभाग, ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था सहभागी आहेत. या तटबंधामुळे घाड नदी खोऱ्यातील जलसंधारणाला हातभार लागणार आहे. या तटबंध कामाचे उद्घाटन कणकवली पंचायत उपसभापती सोनू सावंत यांच्या हस्ते झाले.