रत्नागिरी : मोबाईल टॉवर बॅटरी चोरी प्रकरणी चौघांना अटक
बातमी थोडक्यात
गुन्हे अन्वेषण शाखेच्या गस्तीदरम्यान ४ लाख २२ हजार रुपये किमतीच्या मोबाईल टॉवरच्या तीन बॅटरी चोरी प्रकरणी पालघर जिल्ह्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली. या चोरीमुळे परिसरातील संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली होती. यानंतर सावर्डे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. संशयितांची गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल चौकशी सुरू आहे.