
दादर स्टेशनचे नाव चैत्यभूमी असे होणार
बातमी थोडक्यात
दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी असे करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार हे नामकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने या बदलाला सैद्धांतिक मान्यता दिली असून विधानसभेच्या अधिवेशनात या बदलाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.