
जमीनवाद खून: सांगवी बुद्रुक मध्ये तिघांना अटक
बातमी थोडक्यात
जमीन हक्काच्या वादातून सांगवी बुद्रुक मधील लामणदेव मंदिरा जवळ अशोक येनपुरे यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर त्यांच्या मुलाने तक्रार दाखल केली. या प्रकरणी 18 नोव्हेंबर रोजी तीन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.