
पंढरपूरमध्ये राजा भिंगे यांची गोळी झाडून हत्या
बातमी थोडक्यात
कार्तिकी यात्रेच्या पूर्वसंध्येला इसबवी येथील घरापाशी शिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सराईत गुन्हेगार राजा भिंगे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गावठी पिस्तूलने गोळीबार केल्याने पंढरपूरमध्ये दहशत पसरली. भिंगे यांना लाईफलाईन रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.