
चोगाण मध्ये २३९० रुपयांच्या कर्जासाठी अॅक्सिस बँकेने मुलाची सायकल जप्त केली
बातमी थोडक्यात
२३९० रुपयांच्या कर्जाच्या हप्त्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील चोगाण येथील एका अल्पवयीन मुलाची सायकल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरातून नेली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत असून बँकेच्या वसुलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांवर बँक प्रशासन काय कारवाई करते, हे पाहण्यासाठी नागरिक प्रतिक्षेत आहेत.