
काँग्रेसने जिंकली सांगली जिल्हा बँकेची निवडणूक
बातमी थोडक्यात
सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेसने २२ वर्षांनी पुन्हा अध्यक्षपद पटकावले. महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर शिवसेना नेते तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सांगली आणि सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला.