
रुपिनगरमध्ये व्यावसायिकाला पिस्तूल दाखवून धमकी
बातमी थोडक्यात
तळवडे येथील रुपिनगरमध्ये एका व्यावसायिकाला तोंडावर शिवीगाळ करून त्याच्या पोटावर पिस्तूल दाखवून धमकी देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली येथेही कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यातही एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.