
२२ वर्षांनंतर काँग्रेसने जिंकली सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्षपद
बातमी थोडक्यात
२२ वर्षांच्या भाजपच्या वर्चस्वाला पूर्णविराम देत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड यांची निवड झाली. निवडणुकीत २१ संचालकपदासाठी चुरशीची लढत झाली. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १० जागा मिळवल्या. एका अपक्ष संचालकाच्या निर्णायक भूमिकेमुळे सत्ता समीकरण बदलले. काँग्रेसचा विजय झाला तर भाजपला मोठा धक्का बसला.