
नाशिक कनेक्टर टू समृद्धी महामार्गाचे नियोजन
बातमी थोडक्यात
नाशिककरांसाठी पांढुर्ली ते समृद्धी महामार्गापर्यंत २६ किलोमीटर कनेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईपर्यंतचे अंतर १५ किलोमीटरने कमी होणार आहे. नाशिकरोडकरांना टोल, वळणे टाळून सोयीस्कर मार्ग मिळणार आहे. काम सुरू होण्यापूर्वी जमीन संपादन व निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.