
पाईपलाईन दुरुस्तीसाठी पनवेल पाणी ३६ तासांसाठी बंद
बातमी थोडक्यात
पनवेल शहरातील पाणीपुरवठा भोकरपाडा येथील पाईपलाईन दुरुस्तीसाठी मंगळवार, १७ नोव्हेंबरपासून ३६ तासांसाठी बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असताना नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून दुरुस्तीनंतर दोन ते तीन दिवस पाण्याचा दाब कमी असणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.