
अवैध सावकारी प्रकरणी गोरेगाव महिलेच्या घरावर धाड
बातमी थोडक्यात
गोरेगाव येथील महिलेच्या घरी अवैध सावकारी केल्याच्या संशयावरून धाड टाकण्यात आली. जिल्हा दुय्यम निबंधक पथकाने एक इस्सर चिटी, दोन बंधपत्रे व अन्य कागदपत्रे जप्त केली. सहकार विभागाला तक्रार आल्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गोरेगाव शहरात खळबळ उडाली आहे. कागदपत्रांची तपासणी करून व्यक्तींना बोलावून पुढील कार्यवाही केली जाईल.