
अवैध गौण खनिज उत्खननासाठी ठाणे मेट्रो कंत्राटदाराला ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड
बातमी थोडक्यात
गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि तस्करी केल्याप्रकरणी जे.कुमार इन्फ्रासह १३ कंपन्यांवर ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. १७ कोटी ९७ लाख रुपयांचा दंड भरून बुडालेला सरकारी महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. गौण खनिजांची चोरी केल्याप्रकरणी जे.कुमार इन्फ्राला ३ कोटी २५ लाख रुपयांची वसुली करावी लागणार आहे.