
संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावरून फडणवीस यांना राजीनामा देण्याचा इशारा दिला
बातमी थोडक्यात
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लाडक्या बिल्डर्सचे संरक्षण केल्याचा, एसआरए घोटाळ्याच्या तपासाला खीळ घातल्याचा आरोप केला. एसआरए घोटाळ्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे जवळपास ४० हजार कोटींचे नुकसान होत आहे. मोठा खुलासा होणार असून पुढचा बॉम्ब पडल्यावर राजीनामा द्या, असा इशारा राऊत यांनी दिला.