
ठाणे पोलीस आयुक्तांचा व्हॉट्सॲप हॅक, 20 अश्लील व्हिडिओ अपलोड
बातमी थोडक्यात
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले असून त्यांच्या स्टेटसवर 20 अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासनाला सतर्क केले, त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर पोलिसांनी कारवाई केली. संध्याकाळपर्यंत सर्व व्हिडिओ हटवण्यात आले, परंतु या घटनेने पोलीस दलाला धक्का बसला आहे.