
वीज पंपाद्वारे सारणी धरणातून पाणी चोरल्याचा ग्रामस्थांचा आरोप
बातमी थोडक्यात
पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी-सारणी धरणातून वीज पंपाद्वारे अमर्यादित पाणी उपसा केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. सारणी धरण हे चिव्हेवाडी, देवडी गावांसह परिसरातील वाड्यापाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. अनधिकृतपणे पाणी उपसा केल्यास जलसाठा झपाट्याने कमी होण्याची भीती ग्रामस्थांना आहे.