
पुण्यातील टिंबर मार्केटमधील ५०-६० दुकानांना आगीचा वेढा
बातमी थोडक्यात
पुण्यातील जय वल्लभ स्कूलजवळच्या टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली असून ५० ते ६० लाकडी दुकानांना आगीचा वेढा लागला आहे. अग्निशमन दलाच्या २७ गाड्यांनी आग विझवण्यासाठी दोन तास प्रयत्न केले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.