
बारामती कोर्टांना संप
बातमी थोडक्यात
मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी वाढविण्याच्या मागणीसाठी बारामतीतील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. बारामती आणि पुणे जिल्ह्यातील खटलाकर्ते, वकील आणि नागरिकांना न्यायालयातील कामकाज ठप्प झाल्याने प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वेतनश्रेणी वाढविण्याच्या मागणीचा प्रस्ताव युनियनने शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.