
सातारा : वंचित समाजासाठी आरोग्य शिबीर
बातमी थोडक्यात
सातारा तालुका पंचायत समितीमध्ये २० २६-११-१८ रोजी आयोजित आरोग्य शिबिरात कातकरी, गोसावी, पारधी समाजाला आधार कार्ड व शासकीय योजनांची कागदपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र शासन व राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यावर भर देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचण्याची गरज असल्याचं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केलं.