
सांगलीत ट्रकच्या धडकेने यात्रेकरूचा मृत्यू
बातमी थोडक्यात
आटपाडी तालुक्यातील दिघांची येथे कार्तिक एकादशीच्या यात्रेच्या मिरवणुकीत ट्रकच्या धडकेने वैशाली ऊर्फ नागिनी संजय कोळी यांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले. पोलीस हवालदार विजय हनुमंत झरग याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महिला उपनिरीक्षक धनश्री करंजकर पुढील तपास करत आहेत.