
पुण्यातील मेट्रो कामासाठी भिडे पूल बंद
बातमी थोडक्यात
डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन ते पेठ या मार्गावर पादचारी पूल बांधण्यासाठी मुठा नदीवरील भिडे पूल गुरुवारपासून सुमारे दीड महिन्यासाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर परिणाम होणार असून लाकडी पूल, बालगंधर्व पूल या पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी वाढणार आहे. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पुणे मेट्रो प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.