
पगारवाढ रखडल्याने शिरूर कोर्ट कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप
बातमी थोडक्यात
उच्च न्यायालयाने मंजूर केलेली पगारवाढ महाराष्ट्र शासनाने रखडल्याने समान कामास समान वेतन देण्याच्या मागणीसाठी शिरूर कोर्टातील कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत. या संपाने शिरूर कोर्टाचे कामकाज ठप्प झाले असून दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. शासनाने पगारवाढीचा प्रस्तावाला मंजुरी देईपर्यंत अनिश्चित काळासाठी संप सुरूच राहणार आहे.