
महापालिकेने बसस्थानकावरील अतिक्रमण हटविले
बातमी थोडक्यात
महापालिकेने सोमवार रोजी बसस्थानकावरील चहा हॉटेल, दुकाने यांसह मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटविण्यानंतर शिवाजी महाराज चौक व बसस्थानक परिसरात सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला. यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.