
जमीन संपादनाच्या विलंबामुळे रेवस-रेड्डी महामार्गावरील पुलाचे काम रखडले
बातमी थोडक्यात
रेवस-रेड्डी महामार्गावरील तीन पुलांसाठी जमीन संपादनाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने रस्त्याच्या तपशीलवार आराखड्याला विलंब होत आहे. या प्रकल्पासाठी अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात ५४ हेक्टर खाजगी जमीन अधिग्रहित करावी लागणार असून त्यासाठी नुकसानभरपाईचा खर्च बांधकामाच्या खर्चापेक्षा जास्त असणार आहे. चौळ आणि कोर्लई येथे साळव-रेवदंडा पुलाचे संयुक्त सर्वेक्षण सुरू होणार आहे.