महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मिळणार २ हजार रुपयांची मदत
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील एक कोटी शेतकऱ्यांना डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून दुसऱ्यांदा २ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. १० लाख उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यावरच मदत मिळणार आहे. दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे.