
काँग्रेसने सतेज पाटील यांची गोवा स्क्रीनिंग कमिटीवर नियुक्ती केली
बातमी थोडक्यात
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पाच राज्यांसाठी स्क्रीनिंग कमिटी स्थापन केल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा गोवा कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर पाटील यांनी सोशल मीडियावर पक्षाचे आभार मानले.