
संभाजीनगर मध्ये औरिक फेज २ साठी २ हजार ४५० कोटी रुपये
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर मध्ये औरिक विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडने २ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश संभाजीनगर आणि मराठवाड्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणे आहे. एमआयटीएलने बिडकीनमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी निविदा मागवल्या आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२६ आहे.