
३५ हजार कोर्ट कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या विरोधात संप
बातमी थोडक्यात
२२ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पगारवाढीच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघत नसल्याने राज्यातील कोर्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य न्यायिक कर्मचारी महासंघाच्या 'क' गटाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संपात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या संपाच्या परिणामी कोर्टाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.