
भारत इतिहास संशोधक मंडळात डिजिटायझेशन प्रकल्पाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
बातमी थोडक्यात
पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या विलंबामुळे उशिरा पोहोचले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारत इतिहास संशोधक मंडळात ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पोलीस दलाच्या आदेशाचे पालन करत सदाशिव पेठेत सकाळपासून व्यवसाय बंद होते. 2021 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पातून www.bismarchives.in या संकेतस्थळावर आणखी कागदपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.