
बर्न रुग्णालयाचे बांधकाम ठप्प, रुग्णांना पुण्याला हलविले
बातमी थोडक्यात
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारतीत बांधण्यात आलेल्या बर्न रुग्णालयातील अंतर्गत सुविधा अपूर्ण असल्याने रुग्णालयाचे काम रखडले आहे. आधुनिक बर्न रुग्णालयाअभावी रुग्णांना उपचारासाठी पुण्याला जावे लागत आहे. विद्युत कामाला सुरुवात करण्यासाठी आणि उपचार सुरू करण्यासाठी आर्किटेक्चरचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.