
मुख्यमंत्री, मंत्र्यांसह सर्वांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप प्रियांका खर्गे यांनी केंद्र सरकारवर केला.
बातमी थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्यानंतर प्रियांका खर्गे यांनी मुख्यमंत्री, मंत्र्यांसह सर्वांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला. काँग्रेस नेत्यांचे कथित फोन टॅपिंगवरून राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पेगॅसस स्पायवेअरचा 'गुजरात मॉडेल' म्हणून वापर करत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.