
सांगली आग: फर्निचर गोदामाला लागली आग
बातमी थोडक्यात
दांडेकर कंपाऊंडमधील गणपती फर्निचरच्या गोदामाला पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत फर्निचरचे साहित्य आणि मालवाहू गाडी जळून खाक झाली. आगीच्या ज्वाला कुमार ट्रेड सेंटरमध्ये पसरल्या. तळमजला आणि तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाटे सात वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.