चंदगड तालुक्यातील १२ वर्षीय मुलीवर अत्याचार
बातमी थोडक्यात
चंदगड तालुक्यातील एका १२ वर्षीय मुलीवर एका प्रकल्पाचे काम करून देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून डोळ्यावर पट्टी बांधून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सोमवारी पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.