
ग्रामीण पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ
बातमी थोडक्यात
टोरेंट गॅस कंपनी ग्रामीण पुण्यात सीएनजीच्या दरात १७ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून १ रुपये प्रति किलोने वाढ करणार आहे. नवीन दर १०१.५० रुपये प्रति किलो असेल. याचा फटका रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनधारकांना बसणार आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने या दरात वाढ झाल्याची पुष्टी केली आहे. ग्रामीण पुणे जिल्ह्यात सीएनजी वितरणावर ही वाढ लागू होणार आहे.