
मोटार वाहन निरीक्षक लाच प्रकरणी निलंबित
बातमी थोडक्यात
नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक साजन शालिग्राम शेंडे यांना केळवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लाच प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत शेंडे यांचे निलंबन कायम राहील. त्यांचे मुख्यालय त्याच आरटीओमध्ये राहील. 11 जून 2026 रोजी झालेल्या अटकेनंतर त्यांना जामीन मिळाला आहे.