
लॉरेन्स टोळीकडून बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी
बातमी थोडक्यात
लॉरेन्स टोळीतील गुंड गोल्डी ढिल्लनने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून मुंबईत त्यांचे २०० साथीदार कार्यरत असल्याचा दावा केला आहे. बच्चन यांच्या मुंबईतील घरी तीन ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी पाठवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दोन शार्पशूटर्सना अटक केली आहे.