
पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात
बातमी थोडक्यात
पनवेल रेल्वे स्थानकावर दोन प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होत असून रेल्वेमार्ग अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांची ये-जा सुलभ व्हावी यासाठी स्वयंचलित एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असून प्रवासाचा वेळ एक तासावरून २० मिनिटांवर येणार आहे. पनवेल, कळंबोलीसह परिसरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून सेवेची तारीख निश्चित केली जाईल.