
१६ नोव्हेंबरपासून माथेरानला पाणी कपात
बातमी थोडक्यात
माथेरान शहराला यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे १६ नोव्हेंबरपासून पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पाणी कपातीमुळे पाणीपुरवठ्यावर अवलंबून असणारा हॉटेल व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बुधवारपासून गावकरी आणि व्यावसायिक एकत्र येण्याची योजना आहे.